श्री मयुरेश्वर
मोरगाव
श्री अष्टविनायक मधील पहिले स्थान म्हणजे मोरगाव स्थित श्री मयुरेश्वर.
श्री मयुरेश्वर
या मंदिरात श्री मयूरेश्वराबरोबर त्यांच्या दोन पत्नी रिद्धी व सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. डावीकडे सोंड असलेल्या गणपतीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे जडविलेले आहेत. श्री मयूरेश्वराची मूर्तीची दररोज ३ वेळा पूजा केली जाते. सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता व रात्री ८ वाजता. तसेच सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा आणि रात्री १० वाजता शेजारती केली जाते. गणेश जयंती म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दोन दिवशी मयुरेश्वर मंदिरात पालखी येते. मोरया गोसावी यांनी चिंचवड येथे स्थापन केलेल्या मंगलमूर्ती मंदिरातून ही पालखी आणली जाते. तसेच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मंदिरात जत्रा भरते.
श्री मयुरेश्वर मंदिरातील नंदीची मूर्ती
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे समोर असलेली एक नंदीची मूर्ती. गणपतीसमोर नंदी असलेले हे एकमेव देऊळ आहे. असे म्हणतात कि नंदीची मूर्ती शंकराच्या मंदिरात बसिवण्यासाठी नेत असताना रथाचे चाक मोडून पडल्याने या नंदीला येथेच ठेवण्यात आले. तसेच मंदिरात प्रवेश केल्यावर सहा फूट उंच दगडी उंदीर लक्ष वेधून घेतो.
जाण्याचा मार्ग :- मयुरेश्वर मंदिर कऱ्हा नदीजवळ आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असलेले मोरगाव हे पुण्याजवळून साधारण ६४ किमी अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग ६५ म्हणजे सॊलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केडगाव या ठिकाणावरून वळण घेऊन सुपे मार्गे आपण मोरगावला पोहोचू शकतो.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
श्री अष्टविनायक या मुख्य ब्लॉगला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________