श्री चिंतामणी
थेऊर
श्री अष्टविनायक मधील पाचवे स्थान म्हणजे थेऊर गावातील श्री चिंतामणी
श्री चिंतामणी
ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी या ठिकाणी गणपतीची आराधना केली, म्हणून या गावाला थेऊर हे नाव पडले. अजून एक गोष्ट अशी कि राजा अभिजित व राणी गुणवंती यांचा मुलगा गुणा याने कपिल मुनींकडे असलेले चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले, तेव्हा कपिल मुनींनी गणपतीला हे रत्न गुणाकडून आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणांचा वध करून हे रत्न कपिलमुनींना दिले. मात्र कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते रत्न चढविले व तेव्हा त्यांची चिंता दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. गणपतीचे मंदिर हे धरानिर्धर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बांधले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला सुमारे चाळीस हजार रुपये लागले होते. हे मंदिर आजही मजबूत आहे. चिंतामणीची मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. युरोपियांकडून पेशव्यांना पितळेच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महडला असून एक येथे आहे. वयाच्या २७ व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले. गणपतीच्या समोरच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांची पत्नी रमाबाई गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात अली. मोरया गोसावी यांना येथे सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.जाण्याचा मार्ग :- पुण्यापासून २७ किमी असणारे थेऊर गावी पोहोचण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्गावरील थेऊर फाट्यापासून वळावे लागते.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
श्री अष्टविनायक या मुख्य ब्लॉगला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________