श्री महागणपती - रांजणगाव

 श्री महागणपती 

रांजणगाव 

श्री अष्टविनायक मधील आठवे स्थान म्हणजे रांजणगाव येथील श्री महागणपती

mahaganapati

श्री महागणपती 


त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी शंकराने गणपतीची पूजा केली होती. रांजणगावातील हे मंदिर शंकराने बांधले असून त्यांनी उभारलेल्या गावाला मणिपूर असे नाव दिले. आता हे गाव रांजणगाव म्हणून  ओळखले जाते. येथील मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून त्याचे कपाळ मोठे आहे. मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे असल्याचे सांगितले जाते. या मूळ मूर्तीला दहा तोंड व वीस हात होते. तिला महोत्कट असे म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण असून उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील अशी रचना असून या मंदिराचे बांधकाम ९व्या व १०व्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. त्यांनीच या मंदिरासाठी तळघर बांधले. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी आहेत. दरवाज्यापाशी जय व विजय हे दोन रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व चतुर्थी दिवशी या ठिकाणी मुख्य प्रवेश असतो. 


जाण्याचा मार्ग :- पुणे-अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून ५० किमी अंतरावर हे देऊळ आहे.



___________________________________________________________________________________

अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

श्री अष्टविनायक या मुख्य ब्लॉगला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com

______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर