श्री
जगन्नाथ मंदिर
आपल्या
भारतात अनेक मंदिरे आहेत. सर्वच मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. यांपैकी अनेक
मंदिरे रहस्य आणि चमत्कारिक गोष्टींनी भरलेली आहेत. ही रहस्ये उलगडण्याचा आजवर
अनेकवेळा प्रयोग झाले, पण तरीही ती
रहस्ये राहिली. अशाच प्रकारच्या रहस्यांनी भरलेल्या एका मंदिराबाबत आपण जाणून
घेणार आहोत.
श्री जगन्नाथ मंदिर
श्री
जगन्नाथ मंदिर हे भारतातील ओडिशा राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या पुरी या
शहरातील एक मंदिर आहे. चार धाम मधील एक म्हणूनदेखील या मंदिराची ओळख आहे. मंदिराची
एकूण व्याप्ती 4, 00, 000 स्क्वे. फूट ( 37000 स्क्वे. मी. ) आहे. जगन्नाथ या
शब्दाचा अर्थ जगाचे नाथ असा होतो. नावाप्रमाणेच हे मंदिर जगाचे नाथ असलेल्या श्री
कृष्ण यांचे आहे. मंदिरात श्री कृष्ण, त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्या
मूर्ती प्रतिष्ठापित आहे. जगन्नाथ मंदिरामुळे पुरी या शहराला जगन्नाथपुरी असेही
म्हणले जाते.
श्री
जगन्नाथ मंदिरात अनेक रहस्ये वर्षानुवर्षे दडलेली आहेत. त्यापैकी काही रहस्यांबाबत
आपण जाणून घेणार आहोत.
ध्वज
श्री
जगन्नाथ मंदिराच्या कळसावर सुदर्शन चक्र असून त्यावर ध्वज फडकविला जातो. सामान्यतः
कोणताही ध्वज हा वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेनेच फडकत असतो. परंतु श्री जगन्नाथ
मंदिरावरील ध्वज मात्र याला अपवाद असून हा ध्वज नेहमीच वाऱ्याच्या दिशेच्या उलट्या
दिशेने फडकत असतो. तसेच हा ध्वज दररोज संध्याकाळी बदलला जातो. तो बदलण्यासाटी
पुजारी त्या कळसावर चढतो, पण उलटा. म्हणजे
आपण जर एखाद्या शिडीवर किंवा भिंतीवर चढतो, तेव्हा आपला चेहरा शिडीकडे / भिंतीकडे असतो, पण जगन्नाथ मंदिराच्या कळसावर
चढणारा पुजारी कळसाकडे पाठ करून चढतो.
सुदर्शनचक्र
श्री
जगन्नाथ मंदिराच्या कळसावर सुदर्शनचक्र असून याला निलचक्र असेही म्हणतात. हे चक्र
अष्टधातूंपासून बनले, याचे
वैशिट्य म्हणजे संपूर्ण पुरी शहरातून कोणत्याही ठिकाणावरून आपण चक्राकडे पाहिले, तर ते आपल्याला समोरील बाजूनेच
दिसते. या चक्राला अति पावन व पवित्र मानले जाते.
घुमट
जगन्नाथ
मंदिर हे जगातील सगळ्यात उंच व भव्य मंदिर आहे. हे मंदिर ४ लाख वर्गफूट क्षेत्रात
पसरलेले असून त्याची उंची २१४ फूट आहे. मंदिराजवळ उभे राहून घुमट बघणे अशक्य आहे. पण
इतका भव्य आकार असतानाही मुख्य घुमटाची सावली दिवसातल्या कोणत्याही प्रहरी अदृश्य
असते. आपले पूर्वज किती मोठे इंजीनियर होते, हे जगन्नाथ मंदिरावरून लक्षात येते.
हवेची दिशा
सामान्यतः
दिवस हवा समुद्रावरून जमिनीकडे वाहते व रात्री जमिनीवरून समुद्राकडे वाहते. पण
जगन्नाथ पुरी मध्ये हवा दिवसा जमिनीवरून समुद्राकडे व रात्री समुद्रावरून जमिनीकडे
वाहते.
पक्षी
मंदिराच्या
घुमटावर व आजूबाजूला आजपर्यंत कुठलाही पक्षी उडताना दिसत नाही. घुमटावरून विमान
उडविले जात नाही. मंदिराच्या शिखराच्या आजूबाजूला पक्षी उडताना दिसत नाहीत. भारतातील
अधिकतर मंदिराच्या शिखरावर व आजूबाजूला पक्षी उडताना अथवा बसलेले दिसतात.
स्वयंपाकघर
जगातील
सगळ्यात मोठे स्वयंपाकघर हे जगन्नाथ पुरी मध्ये आहे. ५०० आचारी ३०० सेवकासह जवळपास
२० लाख लोक भोजन करतील, इतका
महाप्रसाद बनवितात. काही हजार लोकांसाठी बनविलेल्या महाप्रसादात काही लाख लोक भोजन
करतात. मंदिरात महाप्रसादाची सगळी तयारी पूर्ण वर्षभरातील प्रत्येक दिवसाची असते. एकही
दिवसाची तयारी कधीही वाया जात नाही. स्वयंपाकघरात महाप्रसाद तयार करण्यासाठी एकावर
एक सात भांडी ठेवली जातात व संपूर्ण स्वयंपाक लाकडावर होतो. या प्रक्रियेमध्ये
सर्वात वरच्या भांड्यातील महाप्रसाद आधी शिजतो व क्रमाक्रमाने खाली शिजत येतो.
समुद्राची गाज
श्री
जगन्नाथ मंदिर हे समुद्रकिनाऱ्यावर आहे.
मंदिराच्या प्रांगणात उभे राहिल्यावर आपण समुद्राचे लाटांचे किनाऱ्यावर आदळताना
येणारे आवाज ऐकू शकतो. पण मंदिराच्या प्रवेशदारात पहिले पाऊल टाकता क्षणी आपल्याला
समुद्राचा कसलाही प्रकारचा आवाज येत नाही. मंदिराच्या बाहेर एका पावलावर हा आवाज
आपल्याला ऐकायला येतो. तसेच मंदिराच्या बाहेर स्वर्गदार आहे, तिथे मोक्ष प्राप्तीसाठी
मृतदेहांवर अग्नी संस्कार केला जातो. पण तेथे जळत असलेल्या मृतदेहांचा वास
मंदिराच्या बाहेर आल्याशिवाय अजिबात येत नाही. मंदिरात वासाचा लवलेशही नाही.
बदलणारी मूर्ती
श्री
जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्णा सोबत बंधू बलराम व बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती
असून त्या तिघांच्या मूर्ती विराजमान आहेत. ह्या तिघांच्या मूर्ती लाकडापासून
बनविलेल्या असून दर बारा वर्षांनी बदलल्या जातात. मूर्ती जरी नवीन असली, तरी आकार व रंग रूप तेच असते. त्या
मूर्तीची पूजा होत नाही. फक्त दर्शनासाठी ठेवतात. दर बारा वर्षांनी मूर्ती बदलताना
त्या दिवशी रात्री गावातील सगळ्या लाईट व घरातील दिवे मालवले जातात, पुजाऱ्याच्या हाताला कापडाने
गुंडाळले जाते व नवीन मूर्तीत जुन्या मूर्तीतले हृदय ठेवले जाते. ते
हृदय आजही ओले असून धडकत आहे. त्याचे तेज नुसत्या डोळ्याला सहन होत नाही, म्हणून डोळे बांधतात.
रथयात्रा
आषाढ
महिन्यात भगवान रथावर स्वार होऊन आपली मावशी गुंडीचाच्या घरी जातात. हि रथयात्रा ५
किलोमीटर पसरलेल्या पुरुषोत्तम क्षेत्रात होते. राणी गुंडीचा भगवान जगन्नाथाचे
परमभक्त राजा इंद्रद्युमन ची बायको होती. म्हणून राणीला जगन्नाथाची मावशी म्हणतात.
आपल्या मावशीच्या घरी भगवान ८ दिवस राहतात. आषाढ शुक्ल दशमीला परतीची यात्रा होते.
भगवान जगन्नाथाचा रथ नंदी घोष
आहे. देवी सुभद्रेचा रथ दर्प दलन आहे. बलभद्राचा रथ तलध्वज आहे. पुरीचे गजपही
महाराज सोन्याच्या झाडूने रथयात्रे समोर झाडतात.
इतर माहिती
जगन्नाथाच्या
समुद्राची राखण हनुमान करतात. तीन वेळा समुद्राने श्री जगन्नाथाचे मंदिर तोडले
होते. तेव्हा पासून महाप्रभूंनी वीर मारुती हनुमानाला समुद्राची राखण करायला
नियुक्त केले. परंतु हनुमान सुद्धा जगनाथ, बलभद्र, सुभद्रा यांच्या दर्शनाचा लोभ आवरू शकत नव्हते. हनुमान
जेव्हा प्रभूच्या दर्शनाला नगरात प्रवेश करत, तेव्हा समुद्रपण त्यांच्या मागोमाग नगरात येत असत. केसरीनंदन
हनुमानाच्या सवयी पासून सुटका करण्यासाठी महाप्रभूंनी हनुमानाला सोन्याच्या बेढीने
बांधून ठेवले. जगनाथ पुरी मध्ये बेढीने बांधलेल्या हनुमानाचे मंदिर प्रसिद्ध आहे. भाविक
सोन्याच्या बेढीमध्ये बांधलेल्या हनुमानाचे दर्शन घेण्यासाटी येतात. महान शीख
सम्राट महाराजा खजीत सिहांनी या मंदिराला प्रचंड प्रमाणात सोने दान दिले, जे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण
मंदिराला दिले, त्यापेक्षाही जास्त होते. पांडव
वनवासात असताना अज्ञातवासात इथे दर्शनासाठी आले होते. मंदिरात पांडव च्या
अस्तित्वाच्या खुणा आहेत.
इसा मसीहा
सिल्क रुटवरुन काश्मीरला आले होते तेव्हा परतबेथलेहम जाताना महाप्रभूंचे दर्शन
केले होते. ९ व्या शतकात आदी शंकराचार्यांनी इथली यात्रा केली चार मठातल्या एका
गोवर्धन मठाची इथे स्थापना केली.
श्री
जगन्नाथ मंदिर हे स. ५. ०० ते रात्री १०. ३० या वेळेत दर्शनासाठी उघडे असते. या
मंदिरात अनिवासी भारतीयांना प्रवेश मिळत नाही. ते जवळील रघुनंदन पुस्तकालयाच्या
छतावरून मंदिर आणि परिसराचे दर्शन घेऊ शकतात. तसेच हिंदू व्यतिरिक्त इतर
धर्मियांना या मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________