श्री बल्लाळेश्वर - पाली

श्री बल्लाळेश्वर

पाली 

श्री अष्टविनायक मधील तिसरे स्थान म्हणजे पाली गावातील श्री बल्लाळेश्वर 

ballaleshwar

श्री बल्लाळेश्वर - पाली

अष्टविनायक मधील हा गणपती भक्ताच्या नावाने ओळखला जातो. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. त्याच्या या भक्तीपायी त्याचे वडील कल्याण शेठ व गावकऱ्यांनी त्याला बेदम मारून एका खोलीत कोंडून ठेवले होते. तेव्हा गणपतीने ब्राह्मणाच्या वेशात येऊन बल्लाळाला दर्शन दिले. तेव्हापासून या गणपतीला बल्लाळेश्वर नावाने ओळखतात. अष्टविनायकातील या एकाच गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. नाना फडणवीसांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे सकाळी सूर्य उगवताच त्याची किरणे थेट मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव असून त्यातील एकाचे पाणी या मंदिराच्या रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनविलेले आहेत. 

जाण्याचा मार्ग :- हे देऊळ पाली या गावी पुण्यापासून ११० किमी वर आहे. पुणे, लोणावळा, खोपोली मार्गे आपण पाली गावी श्री बल्लाळेश्वर मंदिरात जाऊ शकतो.



___________________________________________________________________________________

अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

श्री अष्टविनायक या मुख्य ब्लॉगला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com

______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर