श्री गिरिजात्मज
लेण्याद्रि
श्री अष्टविनायक मधील सहावे स्थान म्हणजे श्री गिरिजात्मज
श्री गिरिजात्मज
गिरिजात्मज हा डोंगरावरील एका गुहेमध्ये असलेला एकमेव गणपती आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्रि गाव वसले आहे. लेण्याद्रि जवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत. त्यातील ८ व्या गुहेत श्री गिरिजात्मजचे देऊळ आहे. या गुहेला गणेशलेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासाठी ३६० पायऱ्या चढाव्या लागतात. एका अखंड दगडात वसविलेले हे मंदिर आहे. मुख्य मंदिराशेजारी ५३ फूट * ५१ फूट व ७ फूट उंचीचे असे सभागृह आहे. या सभागृहात मध्ये कोठे खांब नाही. कडेला फक्त ६ खांब आहेत. उत्तराभिमुख असलेल्या मूर्तीची फक्त एकच बाजू सगळ्यांना दिसते. हि मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीवरेखीव नाही. या गुहेची रचना अशी आहे कि जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनविली याची कोणतीच नोंद नाही.___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
श्री अष्टविनायक या मुख्य ब्लॉगला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________