श्री सिद्धिविनायक
सिद्धटेक
श्री अष्टविनायक मधील दुसरे स्थान म्हणजे सिद्धटेक स्थित श्री सिद्धिविनायक
श्री सिद्धिविनायक
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेक गावी श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. भगवान विष्णू वर्षे मधु व कैटभ या दोन असुरांशी लढत होते, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हते. तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना गणपतीची आराधना करण्यास सांगितले. आराधनेसाठी विष्णूंनी सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. येथे आराधना करून प्राप्त झालेल्या सिध्दीने विष्णूंनी मधु व कैटभ या असुरांचा वध केला. असुरांचा वध गणपती कडून मिळालेल्या सिद्धीचा उपयोग करून झाल्याने या गणपतीला श्री सिद्धिविनायक असे नाव पडले. या गणपतीची सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला आहे. १५ फूट उंच आणि १० फूट रुंदी असलेले हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आहे.श्री सिद्धीवयक मंदिर - सिद्धटेक
३ फूट उंच व अडीच फूट रुंदीची ही मूर्ती स्वयंभू आहे. त्याच्या एका मांडीवर रिद्धी व सिद्धी बसलेल्या आहेत. उत्तराभिमुख असलेल्या या मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असल्यामुळे हा गणपती कडवू मानला जातो. या देवळाला प्रदक्षिणा घालायची म्हटले तर ५ किलोमीटर फिरावे लागते. हरिपंत फडके यांची सरदार पद पेशव्यांनी काढून घेतल्यानंतर त्यांनी या मंदिराला २१ प्रदक्षिणा घातल्या होत्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांना सरदारकी परत मिळाल्याची आख्यायिका आहे. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
श्री अष्टविनायक या मुख्य ब्लॉगला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________