श्री वरदविनायक - महड

श्री वरदविनायक

महड 

श्री अष्टविनायक मधील चौथे स्थान म्हणजे महड येथे स्थित श्री वरदविनायक

varadvinayak

श्री वरदविनायक

अष्टविनायक मधील या गणपतीची पूजा एकदम जवळ जाऊन करता येते व मूर्तीला हात लावून दर्शन घेता येते. नावाप्रमाणेच दिलेल्या वराला पावणारा गणपती म्हणून वरदविनायक प्रसिद्ध आहे.
यासंदर्भात पौराणिक आख्यायिका सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे. वाचकनवी नावाचे ऋषी होते.एकदा त्यांच्या आश्रमाला राजाने भेट दिली, त्यावेळी ऋषीपत्नी त्याच्या रूपावर मोहित झाली. तिने त्याला आपल्या आश्रमात बोलाविले. पण राजाने तिकडे जाण्यास नकार दिला. हे देवांचा राजा इंद्राला कळले तेव्हा त्याने राजाचे रूप घेऊन ऋषिपत्नीचा उपभोग घेतला. त्यातून तिला रूपसामान्द्य नावाचा मुलगा झाला. त्याला मोठेपणी आपल्या जन्माची कथा समजल्यावर त्याने ऋषिपत्नीला म्हणजे आईला शाप देऊन बोराचे झाड बनविले. तिनेही त्याला तुझा मुलगा राक्षस होईल असा शाप दिला. शापित रुपसामान्द्य नंतर पुष्पक जंगलात गेला व गणेशाची पूजा करू लागला. त्याला तिथे देऊळ सापडले ते वरदविनायकाचे.


श्री वरदविनायक मंदिर - महड 

श्री वरदविनायकाची मूर्ती स्वयंभू असून धुंडिप पौडकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली होती. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भीमळकर यांनी देऊळ बांधले व महड गावही वसविले. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटलेला असतो. हा दिवा १८९२ सालापासून पेटलेला आहे असे म्हणतात. या देवळाच्या चारही बाजूस हत्तीच्या मूर्ती आहेत. ८*८ असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. 

जाण्याचा मार्ग :- पुण्यापासून मुळशी, पाटणूस, माणगाव, लोणेरे मार्गे महड गावी जाता येते. यामार्गे १३९ किमी अंतर पडते. तसेच पुण्यापासून खंडेवाडी, खेड शिवापूर, नरसापूर, भोर, बिरवाडी मार्गेही जाता येते. यामार्गे १३१ किमी अंतर पडते.



___________________________________________________________________________________

अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

श्री अष्टविनायक या मुख्य ब्लॉगला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com

______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर