श्री विघ्नेश्वर - ओझर

 श्री विघ्नेश्वर 

ओझर 

श्री अष्टविनायक मधील सातवे स्थान म्हणजे ओझर गावी असलेला श्री विघ्नेश्वर 

vighneshwar

श्री विघ्नेश्वर 

विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि बाधा दूर करणारा म्हणजेच हरणारा म्हणून विघ्नहर. अजून एक आख्यायिका आहे ती म्हणजे राजा अभिनंदन याने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरु केला. त्यामुळे इंद्र भयभीत झाला. इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञात विघ्न आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा वध करण्यासाठी गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली कि तुमचे नाव घेण्याआधी भक्तांनी माझे नाव भक्तिभावाने घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. गणपतीने विघ्नासूराची हि विनंती मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. विघ्नहराच्या मंदिरापुढे २० फूट लांब सभागृह असून आतील गाभारा १० X १०  फूट आहे. मंदिराच्या कडेने संरक्षक मजबूत भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर व नाभीमध्ये हिरे आहेत. १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. 

जाण्याचा मार्ग :- पुण्यापासून जुन्नरमार्गे ओझरला जाता येते. एकूण अंतर ८५ किमी पडते. 



___________________________________________________________________________________

अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

श्री अष्टविनायक या मुख्य ब्लॉगला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com

______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर