कर्माचा भागीदार
एक ब्राम्हण भिक्षा मागण्याकरता एका दारात उभा राहिला. "ओम भवती, भिक्शाम देही" अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती. ती म्हणाली "महाराज मी एकटीच आहे. आमटीभात तयार आहे. चार घरी भिक्षा मागण्यापेक्षा आज इथेच जेवा. ब्राह्मण हो म्हणाला. ब्राह्मणाने जेवण झाल्यावर ताक मागितले. नेमके म्हातारीच्या घरातील ताक संपले होते. ती म्हातारी म्हणाली " थांबा महाराज, मी शेजारणीकडून ताक घेऊन येते. " शेजारणीने भांडे भरून ताक दिले. आजीने ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले. ब्राह्मणाने भुरका मारला तो शेवटचाच, ब्राह्मण तडकाफडकी मेला.
तिकडे यमलोकात चित्रगुप्त आणि यमदेवाला प्रश्न पडला, या कर्माचा भागीदार कोण. कारण
ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती, आजीने अतिथी धर्म पाळला होता, कोणी घरात आले तर नाही म्हणू नये म्हणून शेजारणीने ताक दिले होते आणि
ताक पिऊन ब्रह्मन् मेला होता, कारण
त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून टाकत पडले होते.
यमाने नागाला जाब विचारला. नाग म्हणाला यात माझा काय दोष? घर मला पकडून आकाशमार्गे
चालली होती. माझे तोंड खाली होते,
म्हणून माझ्या तोंडातील गरळ सरळ खाली टाकत पडले, म्हणून ब्रह्मन् मेला. यमाने
घारीला जाब विचारला. घार म्हणाली "माझा काय दोष? सापाला पकडून खाणे हा तर
माझा धर्म. प्रत्येकाने आपापला धर्म पाळला होता. मग आता या कर्माचा भागीदार कोण, हे पाप कोणाच्या माथी
मारायचे. चित्रगुप्त म्हणाला चाल माझ्या बरोबर. या कर्माचे भागीदार मी तुला
दाखवितो. दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण मारून पडला होता, त्या ठिकाणी आले.
हा हा म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली कि आजीच्या घरी जेवताना ब्राह्मण मेला. हळूहळू आळीतल्या बायका तेथे जमल्या. काय हो आजी, ब्राह्मण कसा काय मेला एका बाईने विचारले. तेव्हा एक बाई म्हणाली अहो कसं सांगू तुम्हाला, या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते. ते हडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ठार मारले. चित्रगुप्त म्हणाला पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा आणि तिथे जे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते, त्यांना या कर्माचे भागीदार बनविले आणि जे जे बदनामी करतात, त्यांच्या माथी हे पाप मारले गेले. एखाद्या घटनेबद्दल सत्य माहित नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे. जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानांनी ऐकूनही ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत तुमच्या तोंडाने ती बोलू नका. कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक पापच आहे.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________