कैरी


कैरी




बाजारात कैरी आली

नटून थटून मिरवू लागली


एक कैरी आंबट भलती

मीठ मसाल्यात बुडली पुरती


तिचे मस्त लोणचे केले

बरणीमधे साठवून ठेवले.


एक कैरी बावरली

कुकरमधे लपली


उकडून तिचे पन्हे केले

सर्वांनी मिळून पोटभर प्याले.


एक कैरी म्हणाली थांबा

गोड साखरेत मला डुंबवा


तिचा छान मोरांबा केला

बरणीमधे भरुन ठेवला.


बाकीच्या मात्र पेटीत शिरल्या


आंबा बनून बाहेर पडल्या


आमरस पुरीची मज्जाच न्यारी 


लहान थोर सर्वांना प्यारी


सर्व हौशी भागवून 

आता कैरी निघाली सासरी


पुढच्या वर्षी मे महिन्याच्या च्या सुट्टीत

लवकर ये ग माहेरी.



 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.



ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर