सीतेला स्पर्श


सीतेला स्पर्श 



                    
                    प्रभू श्री रामचंद्र, माता सीता आणि बंधू लक्ष्मण हे वनवासात असताना एका दिवशी मारीच राक्षसासह मिळून रावणाने सीतेला हरण करून लंकेत आणून अशोक वाटिकेत ठेवले. सीता ही रावणाच्या राज्यात, रावणाच्या कैदेत असूनही रावण सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकत नव्हता. नेमके असे काय कारण होते कि रावण सीतेवर बळजबरी न करता सीतेची मनधरणी करीत होता. तर याचे एकमेव कारण म्हणजे कुबेरपुत्र नलकुबेराने रावणाला दिलेला एक शाप. तर जाणून घेऊया त्या शापाविषयी. 

                    रावण एक महान विद्वान पंडित, शूरवीर, सर्व कलांमध्ये निपुण. पण त्याने या सर्व गुणांचा गैर वापर केल्यामुळे त्याचा उदो-उदो करणे पूर्ण चुकीचे ठरेल. त्याने सीतेचे अपहरण करूनही तिला वासनेने स्पर्श केला नाही, असा चुकीचा समज आहे. परंतु त्यामागचे सत्य वेगळे आहे. त्याचे कारण उत्तराखण्डात सापडते. ऊत्तराखंडात सविसाव्या अध्यायात एकोणचाळिसाव्या श्लोकात रावणाला मिळालेल्या शापाचे वर्णन आढळते. त्यात दिलेल्या पौराणिक कथेनुसार रावणाने भगवान शंकराची आराधना करून, प्रसन्न करून त्याच्याकडून वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला. तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला.
                    स्वर्गलोक काबीज करायला निघालेला असताना तो आपला भाऊ कुबेर याच्यावर स्वारी करू पहात होता. वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली. रंभा हि केवळ अप्सरा नव्हती, तर कुबेराची सून व कुबेरपुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती. रंभेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचे प्रयत्न करू लागला. रंभेने त्याला हटकले. त्याने स्वतःचा परिचय दिल्यावर रंभा म्हणाली "तुम्ही तर माझे होणारे चुलतसासरे आणि मी तुमची भावी सून. असे असताना तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणे योग्य नाही. म्हणून तुम्ही माझा मार्ग अडवू नका. " परंतु रावण तिच्यावर आपली शक्ती अजमावू लागला. रभेने तिथून पळ काढून नलकुबेराला येऊन सगळी हकीकत सांगितली. त्यावर रागाच्या भरात नलकुबेराने आपल्या काकांशी म्हणजेच रावणास शाप दिला "तू कोणत्याही परस्रीला मनाविरुद्ध स्पर्श केलास, तर तुझे शीर धडापासून वेगळे होईल. तू दशानन राहणार नाहीस. तुझा लौकिक पुसला जाईल. "



                    या शापामुळे रावण सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकला नाही. म्हणूनच तो तिची मनधरणी करत होता. परंतु सीता त्याच्या प्रलोभनांना बळी पडली नाही. सीतेचे रामावर व रामाचे सीतेवर निःसीम प्रेम होते. याच गोष्टीची रावणाला मनस्वी चीड होती. म्हणून त्याने रामाला संपवण्याचा निश्चय केला होता. परंतु वेगळेच झाले. रावणाचा हेतू शुद्ध नसल्यामुळे त्याचा पराजय व रामाचा विजय झाला व रावणाला सीतेच्या शरीराला स्पर्श करता आला नाही.


 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर