काळभैरवाची भेंडोळी

काळभैरवाची भेंडोळी



                    तुळजाभवानीच्या मंदिरातील खास बघण्यासारखे आकर्षण म्हणजे कालभैरवाची भेंडोळी. ते बोळ आजही भेंडोळीचे बोळ म्हणून  प्रसिद्ध आहे. कालभैरव हा देवीच्या रक्षकगणांपैकी एक असून तो तुळजापूर देवीचा व गावाचा रक्षक आहे. देवीच्या मंदिराशेजारी एक टेकडीवर याचे मंदिर आहे. अश्विन अमावस्येला फिरण्यासाठी म्हणून तो वर्षातून एकदाच बाहेर पडतो. याचे प्रतीक म्हणून दिवाळीच्या अमावस्येला भेंडोळीच्या रूपाने तो जल्लोष साजरा होतो. एक लांब ओंडका घेऊन त्याला तेलात बुडवून कापडाचे तुकडयाची पडिते बांधतात आणि पूजा करून पेटवतात. आधी ती पेटलेली भेंडाळी भेंडोळीच्या बोळातून शिवाजी दरवाज्यातून मंदिरात आणली जाते. तुळजाभवानी मातेच्या सिंहासनाला स्पर्श करून मंदिरात व संपूर्ण गावात फिरवतात. ती फिरवताना लोक त्यावर तेल ओततात. त्यानंतर कमानवेशातील डुल्या मारुतीसमोर संपूर्ण गावात फिरवलेली भेंडोळी शांत करतात.  अशा प्रकारे या उत्सवाची सांगता होते.


 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर