दुसऱ्याचे दुःख
एक मुलगा एका दुकानावर काम करत असतो .त्या कामातून मिळ्णार्या पैश्यातून त्याचे कसेबसे दोन वेळचे जेवण होते.तो रोज आपल्यासाठी चार चपात्या बनवत असतो.एक दिवस तो चपात्या बनवून हात धूण्यासाठी बाहेर जाते,तोच एक चपाती कमी झाली होती...असे दोन तीन दिवस सारखे झाले...शेवटी त्या चपात्या गायब करणार्या उंदराला त्याने पकडले व त्याला खडसावले..तो म्हणाला, का रे माझ्या चपात्या गायब करतोस, मला खायला पुरेशी नाही, ईकडे मी कसेबसे माझे मी भागवतो,मी माझ्या जिवनाला त्रासलो आहे. त्यावर तो उंदीर म्हणाला, अरे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला काय विचारतोस....एका मोठ्या पहाडावर गौतम बुद्ध बसले आहेत त्यांना जावून तुझे प्रश्न विचार ते तुला ऊत्तर देतील.....तो मुलगा त्याच्या जिवनाला इतका कंटाळला होता कि त्याने उंदराची गोष्ट ऐकली.त्याने आपल्या मालकाला चार पाच दिवसाची सुट्टी मागितली व तो गौतम बुद्धाला आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारण्यासाठी वाटेने निघाला....प्रवास खूप लांबचा होता.रात्र झाली, त्याला थांबणे गरजेचे होते, त्याला एक महाल दिसले त्याने तिथे कळवळा करून आसरा घेतला..त्या घरातील महिलेने त्या मुलाला तिकडे जाण्याचे कारण विचारले.त्यावर त्याने सर्व वृत्तांत त्या महिलेला सांगितला...नंतर ती महिला म्हणाली तु तिकडे जातच आहेस तर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर विचारून ये...त्या मुलाने होकारार्थी मान हलवली.
महिला म्हणाली, माझी मुलगी विस वर्षाची आहे पण अजूनही एक शब्द सुद्धा नाही बोलली , ती कधी बोलेल एवढं विचार..असे म्हणून ती रडायला लागली...त्याला तिची सांत्वना करता येईना...त्याने हो म्हटलं.....सकाळ झाली व तो जायला निघाला.जाता जाता दिवसाची सायंकाळ झाली कळले नाही. मोठे मोठे पहाड आले,त्याला रस्ता दिसत नव्हता तोच त्याला एका झाडाखाली बसलेला विदूषक दिसला त्याने विदूषकाला विनवणी केली..मला या पहाडातून रस्ता दिसत नाही आहे तो मला पार करून द्या. त्यावर विदूषकाने तिकडे जाण्याचे कारण विचारले त्यावर त्याने सांगितले..विदूषक म्हणाला ठिक आहे मी रस्ता पार करून देतो पण माझा पण एक प्रश्न आहे तो तेवढा विचार त्याने हो म्हटलं.....मी वि स वर्षापासून तपश्चर्या करत आहे तर मला मोक्ष कधी मिळणार हे विचार.....मग विदूषकाने जादूई काडी फिरवून त्याला पहाड पार करून दिले. तो सपाट रस्त्यावर आला तोच त्याला नदी दिसली. आता हि नदी कशी पार करायची हा मुद्दा होता मग त्याला मोठा कासव दिसला त्याने कासवाला त्याच्या पाठीवर नदी पार करून देण्याशिवायी म्हटले. कासवाने सुद्धा गौतम बुद्धांना प्रश्न विचारावयास सांगितलं.....मला खूप मोठ व्हायचं आहे त्यासाठी मी काय कराव हे विचार.......कासवाने नदी पार करून दिली..मग तो गौतम बुद्धाच्या आश्रमात पोहचले..तोच गौतम बुद्ध म्हणाले कि, मी तुझ्या कोणत्या तीन प्रश्नांची उत्तरं देणार...त्यावर त्या मुलाला प्रश्न पडला आपल्याला तर चार प्रश्न विचारायचे होते. आता कोणाचे प्रश्न विचारावे व कोण्या एकाचा सोडावा हे समजत नव्हते. त्याला डोळ्यात आसवे असलेली महिला, विस वर्षाची तपश्चर्या असलेला विदूषक,अन पाठी वर नदी पार करून देणारा कासव हे तिघे अन स्वतःचे प्रश्न. शेवटी त्याने निर्णय घेतला .मला कशीतरी नोकरी आहे ,पण बाकीच्यांचे महत्वाचे आहेत.......मग गौतम बुद्धानी सांगितलं.....महलातील महिलेच्या मुलीचे लग्न ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून ती बोलेल, विदूषक जेव्हा त्याची जादूई काडी सोडेन त्या दिवशी त्याला मोक्ष मिळेल, कासव जेव्हा त्याचे वरचे कवच काढून टाकेल तेव्हा तो खूप मोठा होईल....
गौतम बुद्धानी सांगितेले उत्तरे घेवून तो परतीच्या वाटेने निघाला. कासवाला सांगितल्याप्रमाणे त्याने लगेच कवच काढून टाकले तर त्यातून भरपुर मोती सांडले. कासव म्हणाला मी या मोत्याचे काय करनार ते तु घेवून जा. कासव मोठा होवून निघून गेला, तो विदूषकाजवळ आला व उत्तर सांगितलं त्यावर लगेच विदूषकाने ती जादूई काडी त्या मुलाला दिली व त्याला मोक्ष प्राप्त झाले, महालातील महिलेला गौतम बुद्धानी सांगितल्याप्रमाणे मुलीचे लग्न होताच ती बोलायला लागेल हे एकल्यावर महिलेने त्या मुलीचे लग्न त्या मुलाशी लावून दिले व लगेच ती मुलगी बोलायला लागली....
तात्पर्य:-
त्या मुलाने स्वतःचा विचार न करता बाकीच्यांचा विचार केला...स्वतः चे प्रश्न विचारले असते तर त्याला बाकीचे मिळाले नसते.म्हणून जो स्वतः आधी दुसर्याच्या सुखाचा विचार करतो तो नेहमी सुखात असतो....पैशाच्या सुखापेक्षाही आंतरिक सुखाची किंमत कोणत्याही रकमेत मोजता येणार नाही....
नेहमी आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे-
*स्वसुखाआधी दुसर्याचा विचार करा...सुख आपोआप आपल्या पायी लोटांगण घालेल
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________