पूर्व जन्माचे ऋण
श्री
प्रभू रामचंद्र, माता
सीता आणि भ्राता लक्ष्मण हे वनवासात असताना एके दिवशी माता सीतेला खूप तहान लागली
होती. श्री रामांनी सर्वत्र बघितले, पण कोठेच पाणी मिळेना. सर्वत्र जंगलच होते. रामांनी पृथ्वी मातेला
जेथे कुठे पाणी असेल, तेथे
जाण्याचा मार्ग दाखविण्याची प्रार्थना केली. तिथे एक मयूर आला व म्हणाला
"थोड्याच अंतरावर पुढे एक जलाशय आहे. चला मी मार्ग दाखवतो. पण मार्गात मी उडत
उडत जाईन, आपण चालत
येणार, त्यामुळे चुकामुक होवू शकते.
म्हणून मी मार्गात माझे एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडून आपण जलाशयाजवळ
पोहोचाल. "
आपल्याला
माहिती आहे कि मयूराचे पंख विशेष काळी व विशेष ऋतूमध्ये तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरुद्ध
जर पंख निघत असतील, तर मात्र
मोराचा मृत्यू ओढवतो आणि तेच झाले. इच्छेविरुद्ध पंख निघत होते. त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ
आला होता. त्यामुळे मोर म्हणाला "जो जगाची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान
भागविण्याचे सौभाग्य आज मला प्राप्त झाले आहे. माझे जीवन धन्य झाले आहे. मरताना
माझी काही इच्छा शेष राहिली नाही. "
तेव्हा मर्यादा पुरषोत्तम श्रीरामाने मयूरास म्हटले
"माझ्यासाठी जे मयूर पंख इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण
झाले व हा जो ऋणबंध झाला आहे, त्याचे
ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेन. पुढील जन्मी मी तुला माझ्या मुकुटावर धारण
करेन"
प्रभू श्री रामचंद्रांच्या अवतारानंतर श्री विष्णूंचा पुढील अवतार श्री कृष्ण होता. आणि आपण हे जाणतो कि श्री कृष्णाच्या मुकुटावर मयूरपंख आहे. अशा तऱ्हेने प्रभू रामचंद्रांनी मयूराचे पूर्व जन्माचे ऋण फेडले.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________