दैवं न परिवर्तते - भाग्य बदलत नाही
एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन भ्रमण करायला निघाले असता मार्गात एका निर्धन ब्राम्हणाला भिक्षा मागताना पाहतात. अर्जुनाला त्या ब्राम्हणाची खूप दया येते, म्हणून तो त्या ब्राम्हणाला सुवर्णमुद्रा भरलेली एक थैली देतो, ज्यामुळे त्या ब्राम्हणाची गरिबी दूर होईल, असा विचार करतो. तो ब्राम्हण त्या मुद्रा बघून खूप आनंदी होतो आणि आपल्या चांगल्या भविष्याची कल्पना करत आपल्या घरी जायला निघतो, पण त्याचे दुर्भाग्य त्याचा साथ सोडत नाही. रस्त्यातच एक लुटेरा त्याची थैली हिसकावून घेतो. ब्राम्हण दुखी होऊन परत भिक्षा मागण्यास सुरुवात करतो. दुसऱ्या दिवशी तो अर्जुनाला परत भिक्षा मागताना दिसतो. अर्जुन त्याला त्याच्या या परिस्थितीचे कारण विचारतो, तेव्हा तो ब्राम्हण अर्जुनाला आपबिती सांगतो. अर्जुनाला परत त्याची दया येते व तो एक मौल्यवान माणिक देतो. ते घेऊन ब्राम्हण घरी जातो. त्याला ते माणिक कुठे ठेवायचे, याची चिंता लागते. कारण त्याला ते मौल्यवान माणिक चोरी होणार, याची भीती वाटत असते. हा माणिक लपवून ठेवू शकू व कोणाची नजरपण जाणार नाही, अशी जागा शोधत असतो. त्याची नजर एका माठाकडे जाते. तो माठ पडीक असून खूप दिवसात त्याचा वापर झालेला नसतो. तो मौल्यवान माणिक त्या माठात लपवून ठेवतो. दिवसभराच्या थकवटीने त्याला झोप लागते. त्याची बायको नदीवर पाणी भरण्यासाठी जाते. रस्त्यात तिच्या पायाला ठेच लागून तिच्या हातातील माठ खाली पडतो व फुटतो. घरी जुना माठ आहे, त्यात आता पाणी भरून आणावे लागेल, असा विचार करून ती घरी येऊन जुना माठ घेऊन नदीवर पाण्याला जाते. जसा तो माठ पाण्यात बुडवते, ते माणिक पाण्यात पडते. ब्राम्हणाला हे माहित झाल्यावर तो आपल्या भाग्याला कोसतो व परत भिक्षा मागायला सुरुवात करतो.
थोडक्यात काय तर आपण कितीही प्रयत्न केले तरी जे विधिलिखित आहे, ते बदलू शकत नाही.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________