माहेरवाशीण
(काही वर्षापूर्वीची) (सध्याच्या काळातील)
गाडी आली घुंगुराची, आली रिक्षा गेटवरी,
लेक आली माहेराला| लेक माहेराला आली।
गेला होता ग लाडका, नव्हते कोणी स्वागतासी,
भाऊराया आणायला | वोचमनने रजिस्टरला नोंद केली।1।
लिंबलोण आनंदे उतरी, फ्लॅटचे बंद दार पाहुनी
हसरी ती वहिनीबाई | बेल वाजवी ती दारावरी।
आई आणि बाबांच्याही, थकलेले आई-बाबा,
आनंदा पारावार नाही| हसतमुखाने आले सामोरी।2।
मामा मामीच्या भोवती, आय टी मध्ये भाऊ-वहिनी,
गलका होतो भाचरांचा| नाही मिळाली गं सुट्टी।
आणि आईच्या मिठीत, थरथरत्या हाताने आजी
देह विसावतो लेकीचा| पाणी आणते नातवांसाठी।3।
आई मायेने न्हाऊ घाली, सकाळी डब्यांची घाई घाई,
जरी अंगी नसे शक्ती| घाई कामवालीची गं पुन्हा।
आईची ग माया ती, लेकीला न्हाऊ घालण्याची,
वर्णावी किती किती ? इच्छा पुरी गं होईना।4।
लेक आली माहेराला, माहेराला लेक आली
आज केली ग सांजोरी| ' स्वीग्गी ' धावली मदतीला।
उद्यासाठी पुरणपोळी, पिझ्झा, समोसे,वडे नाश्त्यासाठी,
रोज नव्या नव्या खिरी| घरी बनवण्या वेळ इथे कोणाला?।5।
किती करू लेकीसाठी! टी. व्ही.वरील कार्टून,
मन आईचे भरेना| आणि मोबाईलवरती गेम।
आईची ती माया, नाही कोणी खेळायला,
ओसरता ओसरेना| मुले बसली गं रुसून।6।
विटीदांडू आणि गोट्या, ऑनलाईन मागविली साडी,
खेळ रंगतो मुलांचा| ऑनलाईन खेळणीही मुलांसाठी।
आई आणि मामीसंगे, मुलं बसली हटून,
खेळ चाले भातुकलीचा| मॉल मध्ये जाण्यासाठी।7।
रोज नव्या नव्या गप्पा, लेकी संगे काय देऊ?
वाटतो वेळच अपूरा| विचार करते गं आई।
दिवस संपले बघता बघता, शेवटी भावाने देण्यासाठी
लेक निघाली सासुरा| आणली गं मिक्स मिठाई।8।
लेकीसाठी साडीचोळी, लेक निघाली सासुराला,
मुलांसाठी कपडे,खेळणी| रिक्षा मागविली दारी।
कुरडया आणि पापड, आई-बाबा निरोपला,
संगे मुरंबा लोणच्याची बरणी| भाऊ-वहिनी नाही घरी।9।
गेली घुंगुराची गाडी, तरीही लेक समाधानी,
मनी दाटली हुरहूर| तिजला वाईट नाही वाटले।
मागे चाले वेडी माया, आई-बाबा,भाऊ-वहिनी,
डोळी आसवांचा पूर | चार दिवस तरी भेटले।10।
कुणी लिहिले माहीत नाही पण दोन्ही दशकांचा साक्षीदार.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________