कन्यादान

 

कन्यादान




गुरुजींनी कन्यादानासाठी हात पुढे करायला सांगितला... 


आणि 


तीचा हात थरथरला...


ज्या पुरुषाने हा हात धरून जगात आणलं तोच पुरुष आज हा हात दुसऱ्या पुरुषाच्या हातात देणार 


आणि 


मी त्या सगळ्यावर विश्वास ठेवून उरलेल आयुष्य जगायचं ही कल्पनाच तिला सहन होण्यासारखी नव्हती..


 आणि 


अचानक तिचा हात त्या बापाने धरला आणि त्या होणाऱ्या नवऱ्याने त्या हाताला खालून आधार दिला..


 कन्यादानाचा विधी सुरू झाला... 


हातातून पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर त्या वडिलांच्या डोळ्यातून थेंब पडत होते.. 


पोटची पोर दान करताना काय अवस्था होते हे तेव्हा त्या बापाला कळत होतं..


 तो विधी संपला आणि आई वडिलांच्या हातात दिव्यांनी भरलेली एक झाल दिली..


 त्यांच्यासमोर मुलगी आणि तिच्या सासरच्या सगळ्या मंडळींना बसवलं.. 


आणि 


गुरुजी म्हटले आजपासून तुमची मुलगी त्यांची झाली..


 त्यांना सांगा तिचा नीट सांभाळ करा...


 आई एकदम पोरकीच झाली.. 

तिच्या डोळे गच्च भरलेले.. 

पोरीला सहलीला दोन दिवस पाठवणं जीवावर येणाऱ्या ह्या आईला त्या पोरीला दुसऱ्याच्या घरी कायमच पाठवून आपल्या घरची पाहूणी करायचं हे पचवणं किती कठीण आहे हे तेव्हा त्या आईला कळत होतं...


 तो विधी संपला 


 मुलगा वेशीपाशी आला... 


गुरुजी ओरडले मामाने मुलीला घेऊन या..


 त्या मामाचा हात धरून ती त्या अंतरपाटाजवळ जात होती.. 


सुट्टीत घरी राहायला आली की मात्र मामा फक्त तिचा आणि ती त्या मामाची.. 


सकाळी उठून एकत्र नाष्टा मग दंगा मग मामीच्या हातच जेवण आणि रात्री मामाच्या कुशीत झोपणारी भाच्ची आज मला दुसऱ्याच्या हातात द्यावी लागणार.. ह्या विचारात त्याने तो धरलेला हात अजून घट्ट केला.. 

ती उभी राहिली.. 

आणि 

मंगलाष्टका सुरू झाल्या... 

अंतरपाट धरलेल्या त्या दादाकडे बघताना ती मागे गेली.. भाऊबीजेच्या दिवशी न मागता मिळणारी गोष्ट, एकत्र उडवलेले फटाके, टीव्ही कोणी बघायचा ह्यावरून झालेलं भांडण आणि आजोबा सोडून गेल्यावर गळ्यात पडून रडलेले ते दोघेजण आज एकमेकांना कडे बघून तितकेच हळवे झालेले..


 मंगलाष्टका संपल्या आणि तिला तिच्या पुढ्यात उभं असलेल्या नवीन आयुष्याची चाहूल लागली.. 


तिने हार घातला आणि त्याच्या बाजूला उभी राहिली.. 


तिच्यासमोर अनेक जण उभी होती.. 

कोणी आशीर्वाद देत होत तर कोणी जवळ घेऊन कौतुक करत होत.. 

फोटोसाठी मैत्रिणी आल्या.. 

एकीनी तिचा हात धरला 

एकीनी तिच्या पदर अडकलेला तो सावरला आणि एकीनी तिचे डोळे पुसले.. 


आम्ही घरी राहायला येतोय ग आज.. काकूंना म्हणावं  जेवायला येऊ.. त्या एका खोलीतला आवाज, तो एकमेकींवरचा हक्क आणि एकत्र राहून जगलेले ते दिवस तिला आठवले 


आणि अचानक नवरा म्हटला तुमच्या चौघींचा फोटो काढा आधी मी बाजूला होतो... 


आणि ते चारही चेहरे हसले.. 


जेवणाच्या पंगतीत आज ती आई बाबांपासून लांब दुसऱ्याच लोकांबरोबर बसलेली.. 


जेवणं उरकली आणि गुरुजींनी गौरीहार पुजायला बोलवलं..


 तिने तो मनापासून पुजला आईने ओटी भरली आणि काकू म्हटली आता मागे वळू नकोस आणि ती हादरली


ती पुढे जात होती आणि इतके वर्ष पोटच्या पोरीसारख जपलेल्या त्या काकाचा बांध फुटला.. 


शाळेतून घरी यायला उशीर झाला पोरीला तरी अस्वस्थ होणार तो.. 


वाढदिवसाला ५ -६ फ्रॉक तिच्या पुढ्यात आणून ठेवणारा काका ... 


मी नाही येणार आज घरी मी काकुजवळ राहणार म्हणून रडणारी ती आज मात्र कायमची लांब जात होती हे तिच्या दुसऱ्या आई बापाला पण पचत नव्हतं.. 

तिची ओळख मात्र आज बदललेली.. हातातला हिरवा चुडा पायातली जोडवी आणि गळ्यातल मंगळसूत्र पुढच्या नवीन आयुष्याची वाट दाखवत होती..


 सासूबाईंचा हात धरून ती त्या फुलाने सजवलेल्या गाडीत नवऱ्याबरोबर बसली.. त्या गाडीत हसू होत आणि त्या गाडीच्या दाराबाहेर उभे असलेले सगळे मात्र केविलवाण्या नजरेने तिचा निरोप घेत होते.. 

आणि ती म्हटली आई बाबा मी येते.।।



 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.



ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर