श्री क्षेत्र गाणगापूर

 श्री क्षेत्र गाणगापूर

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवा नंद सरस्वती सद्गुरू नाथा कृपा करा

श्री दत्तावतार हा एक सर्वश्रेष्ठ अवतार आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचा एकत्रितपणे साकार झालेला दत्तावतार आहे. हा अवतार मोक्षदायी, शाश्वत, गुरुस्थानी आहे. श्री गुरुदत्तांनी अत्री ऋषींची भार्या सती अनुसूयेच्या पोटी जन्म घेतला आणि भक्तांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती अवताराने नरसोबा वाडी, औदुंबर वाडी, गंगापूर येथे ते प्रकट झाले. त्यांच्या वास्तव्याने ही सारी क्षेत्रे पुण्यक्षेत्र व तीर्थक्षेत्र झाली असून यांपैकी गाणगापूर हे क्षेत्र सर्वश्रेष्ठ मानले जाते. मुंबई-चेन्नई महामार्गावर सोलापूरपासून ९० किमी अंतरावर गाणगापूर रोड हे रेल्वे स्टेशन आहे. तेथून १६ किमी अंतरावर श्री क्षेत्र गाणगापूर आहे. तेथे जाण्यास स्टेशनवरून ST बस आहेत. श्री क्षेत्र गाणगापूर हे पूर्वी गंधर्वपूर या नावाने ओळखले जायचे. दत्तमहाराजांच्या वास्तव्यानंतर याला गाणगापूर हे नाव पडले. गाणगापूर हे ठिकाण अनुष्ठान करण्यास योग्य वाटल्यामुळे श्रींनी तेथेच कायमची वस्ती केली आणि आपल्या सहजदिकेने कित्येक गृहस्थाश्रमींना, विरक्तांना, तपस्वींना आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याने नानाविध चमत्कार कुणी दाखविले. बाराही महिने सेवेकरी लोक आपल्या ऎश्चिक कामना पूर्ण करून घेण्यासाठी सेवा करत असतात. निरनिराळ्या प्रांतातले अगर धर्माचे, जातीचे लोक शारीरिक कष्टामुळे व सावकारी पाशामुळे त्रासून गाणगापुरात येऊन सेवा करीत असतात. तेथे गुरुचरित्राचे पारायण करणे, प्रदक्षिणा घालणे, नामस्मरण करणे अशा सेवा करतात. थोडक्यात ज्यांना जशी सेवा करावीशी वाटते, तशी सेवा करून इच्छित श्रेय प्राप्त करतात. 

श्री क्षेत्र गाणगापूर येथील श्री दत्तावतार मंदिरात दर्शनासाठी भाविकांची भव्य गर्दी होते. या मंदिरासह येथे अनेक ठिकाणे आहेत जेथे भाविक दर्शनासाठी जातात. ही सर्व ठिकाणे काहीनाकाही रूपाने श्री गुरु दत्तांशी जोडली गेली आहेत. अशाच काही ठिकाणांची माहिती व त्यांची महती पुढे दिलेली आहे. माहिती जाणून घेण्यासाठी ठिकाणांच्या नावावर क्लिक करावे


            १.         अष्ट तीर्थ 

            २.         भस्माचा डोंगर

            ३.         निर्गुण पादुका 

            ४.         विश्रांती कट्टा 






 ___________________________________________________________________________________


अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________



फॉलोअर